रेड्डी यांच्या तक्रारीची दखल, गतिरोधकाची झाली दुरुस्ती

0
86

रेड्डी यांच्या कानउघाडणी नंतर अपघातप्रवण गतिरोधकाची दुरुस्ती ।।

घुग्घुस/ पांढरकवडा :- चंद्रपूर घुग्घुस मार्गावरील पांढरकवडा गावालगत मुख्य मार्गावर IVRCL कंपनीतर्फे गतिरोधकाची निर्मिती करण्यात आली होती.
मात्र हा गतिरोधक दोषपूर्ण असल्यामुळे या गतिरोधकामुळे दुचाकी वाहन चालकांना अपघाताला बळी पडावे लागत होते.
चार – पाच दिवसांपूर्वी चंद्रपूर येथून वणी कडे स्कूटीने जात असलेल्या माय – लेकी पैकी आई ही गतिरोधकावरून उंच उडून खाली पडली तिच्या डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव शुरू झाला व ती महिला बेशुद्ध झाली त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली मात्र कुणीच मददतीला पुढे येईना घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष आपल्या सहकारी मित्र सय्यद अनवर, विशाल मादर, रोशन दंतलवार यांच्या सोबत चंद्रपूर जात असतांना अपघातग्रस्त महिला दिसून आली.
तात्काळ त्यांनी आपल्या मित्राच्या मददतीने ऑटोरिक्षा मध्ये बसवून सोबत एक सहकारी देऊन घुग्घुस येथे रुग्णालयात पोहचविले व महिलेच्या मुलीला धीर देऊन आपला संपर्क नंबर दिला व काही अडचण आल्यास तात्काळ फोन कर आम्ही मददतीला हजर राहू ही ग्वाही दिली.
यानंतर IVRCL या कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले येत्या दोन दिवसात जर गतिरोधकाची दुरुस्ती न केल्यास गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला असता कंपनीतर्फे तात्काळ सदर दोषपूर्ण गतिरोधक तोडून नवीन दुरुस्तीयुक्त गतिरोधकाची निर्मिती करण्यात आली आहे.
यामुळे आता अपघातापासून नागरिकांचे बचाव होईल .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here