शेतकरी पोहचला मृत बैला सह पशु अधिकारी कार्यालयात

0
88

 

वणी
तालुक्यात लंपी स्किन डिसीज या आजाराने हजारो जनावरे ग्रस्त झाली असतांना टाकळी येथील

मृत बैला सह शेतकरी पोहचला पशु अधिकारी कार्यालयात
नुकसानभरपाई ची मागणी,पशुधन धोक्यात

अल्पभूधारक शेतकऱ्याचा बैल या आजाराने दगावल्याने नुकसानभरपाई भरपाई देण्यात यावी या करिता मृत बैल घेऊन शेतकऱ्याने पशुधन विकास अधिकारी यांचे कार्यालय गाठल्याने एकच खळबळ उडाली आहे

सम्पूर्ण देशात मनुष्या वर कोरोना आजाराने थैमान घातले आहे त्यामुळे अनेकांना होम कोरन्टटाईन व्हावे लागले आहे मात्र आता जनावरांना देखील कोरन्टटाईन करण्याची वेळ शेतकऱ्यानं वर आली आहे जनावरांवर लंपी स्किन डिसीज ह्या आजाराची लागण सुरू झाल्याने तालुक्यात हजारो जनावरे या आजाराने बाधित झाली आहे पशु विकास अधिकाऱ्यानं कडून या आजारा वर बचाव कसा करता येईल याचे मार्गदर्शन सुरू केले आहे मात्र रिक्त पदामुळे अनेक गावातील पशु चिकित्सालय ओस पडले असून बाधित जनावरांवर उपचार होत नसल्याने पशुधन पालक चांगलाच संतापला आहे तालुक्यात कायर,शिरपूर,निलजई, कुरई, व ढुनकी येथे प्रथम श्रेणी तर नांदेपेरा, बोर्डा, निंबाला,सावरला,अहेरी,कोलगाव, कळमना,व शिंदोला येथे द्वितीय श्रेणी दवाखाने असे एकूण 13 पशु चिकित्सालय आहे मात्र या दवाखान्यातील अनेक पदे रिक्त असल्याने जनावरांवर उपचार होण्यास अडचण निर्माण झाली आहे टाकळी येथील महादेव झाडे वय 60 यांना तीन एकर शेती आहे दोन बैलांच्या सहाय्याने ते शेती करितात यातील एका बैलाला लंपी स्किन डिसीज चा आजार झाल्याने त्यांनी कोलगाव येथील पशु चिकित्सालयात उपचारासाठी जनावर नेले असता त्या ठिकाणी कर्मचाऱ्या अभावी त्या बैलावर उपचार झाला नाही त्यामुळे बैल दगवल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे बैल दगावल्याने आता शेती करायची कशी असा प्रश्न त्या शेतकऱ्या समोर उभा आहे उपचारा अभावी बैल दगावल्याने शेतकरी संघटने दशरथ बोबडे यांनी मृत बैला सह शेतकऱ्याला सोबत घेऊन पशु विकास अधिकारी यांचे कार्यालय गाठून रिक्त असलेले पदे त्वरित भरुन बाधित जनावरांवर उपचार करण्यात यावे व शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची मागणी खेळू आहे शेतकरी मृत बैला सह पशु विकास अधिकारी यांच्या कार्यालयात पोहचल्याने चांगलीच खळबळ उडाली होती
फोटो पाठवला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here