नोकरीच्या नावावर लाखोंची फसवणूक :: वर्धा नदीत इसमाची आत्महत्या

0
101

 

घुग्घुस :

आपल्या मुलांना नौकरी मिळावी ते सेटल व्हावे या आशेने तब्बल २३ लाख रुपये दिले मात्र “तेल ही गेले “तूप ही गेले ” अशी अवस्था झालेल्या वेकोली कर्मी राजू ईश्वर आसेवार यांनी सुसाईड नोट लिहून वर्धा नदीत उडी घेवून आत्महत्या केली

नोकरीच्या नावावर लाखोंची फसवणूक झाल्यामुळे इसमाची वर्धा नदीत आत्महत्या ?

घुग्घुस येथील प्रदीप राजु आसेकर (२६) हा युवक पॉली झाला असून तो व त्याचा भाऊ नौकरीच्या शोधात असताना त्यांची ओळख गणेश सहारे रा.भद्रावती यांचेशी सन २०१६ या वर्षी झाली व तो गणेशला भेटायला भद्रावती येथे गेला व नोकरी बाबत चर्चा झाली असता त्याने प्रदीप आसेकर यांचेशी ओळख करुन दिली.
प्रदीपच्या माहितीनुसार किशोर गुलाब जगताप रा.वरोरा यांनी वनविभाग, सामान्य रुग्णालय तसेच नगरपरिषद या ठिकाणी पैसे घेऊन सरकारी नौकरी लावुन देतो व जाॅब प्लेसमेंट नावाचे आमचे एक कार्यालय आहे असे सांगीतले.
एक महिण्यानंतर प्रदीप आसेकर व त्याचे वडील गणेश सहारे सोबत किशोर जगताप यास कार्यालया मध्ये भेटायला गेले असता तेव्हा तो म्हणाला कि लाॅरेन्स नावाचा एक व्यक्ती आहे त्याची चांगली ओळख असून त्याची जाॅब प्लेसमेंट देण्याकरीता एक कंपनी आहे.
त्यांनी वनविभागात नौकरी लावुन देण्याकरीता ४ लाख ५० हजार व लहान भाऊ निखीलला नागपूर येथे महाजनको या ठिकाणी नौकरी लावण्या करीता १० लाख रुपयाची मागणी केली. बेरोजगार युवकांच्या वडीलाने पैश्याची जुळवा जुळव करण्यासाठी करंजी येथील ४.५ एकर शेती १४ लाख रुपयात विकली व त्यातील ५ लाख रुपये प्रदीप व त्याच्या वडीलाने वरोरा येथे जाऊन किशोर जगताप व गणेश सहारे यांना दिले.त्यानंतर गणेश सहारे यास २ लाख रुपयाचा धनादेश दिला.
असे एकूण २३ लाख ५० हजार त्यांच्या कडुन त्या भामट्यांनी घेतले.
मात्र नौकरी लावून दिली नाही यामुळे या युवकांनी वारंवार नौकरी चा तागदा लावला असता उडवा उडवीचे उत्तर देत ४ वर्षाच्या कालखंडात हे भामटे भुमीगत झाले शेवटी त्रस्त होऊन दिनांक १४/७/२०२० ला वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता कलम ४२०(३४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र पोलिसांनी कोणतीही चौकशी केली नाही यामुळे ते नैराश्यात होते दिनांक २६ आगस्ट २०२० ला आसेकर हे घरून निघून गेले त्याची शोधाशोध केली असता वर्धा नदीच्या बेलोरा घाट पाणी टाकी जवळ दूरध्वनी, चप्पल व पैसे ठेऊन असल्याचे पोलिसांनी सांगितले परंतु त्यांचा शोध लागला नाही यामुळे घुग्गुस पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असता पोलिसांनी लापता(मिसींग ) केस दाखल केली व ठाणेदार गांगुर्डे यांनी पोलीस आपत्ती व्यवस्थापन कडून बोट बोलावून बोट चालक अशोक गर्गेलवार, मंगेश मते, उमेश बनकर, समीर चापले, गिरीश मराने, विक्की खांडेकर, सुजित मोगरे व चव्हाण यांनी बेलोरा घाटाच्या पाणी टाकी पासून शोध मोहीम राबविली परंतु त्यांचा काही शोध लागला नाही.
दिनांक २७ ऑगस्ट रोजी वर्धा नदीच्या नकोडा घाट परिसरात त्यांचा शव मिळाला असून पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here