विद्यार्थी हिताच्या मागण्या करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यावर अमानुष हल्ला करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध.*

0
90

*विद्यार्थी हिताच्या मागण्या करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यावर अमानुष हल्ला करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध.*

महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांचे ३० टक्के प्रवेश शुल्क व न घेण्यात आलेल्या परीक्षांचे शुल्क परत करण्यात यावे.

विद्यार्थी हिताच्या मागण्या करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यावर अमानुष हल्ला करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध.

प्रवेश शुल्क ४ टप्प्यामध्ये घेण्यात यावे, या मागणीला धरून आंदोलन करणाऱ्या धुळ्यातील अभाविप च्या कार्यकर्त्यांना बेदम,अमानुष मारहाण करण्याचे आदेश देणाऱ्या हिंसक वृत्तीचे समर्थन करणाऱ्या पालकमंत्री अब्दुल सत्तार व उद्धव ठाकरे सरकारचा अभाविप चंद्रपूर द्वारा जाहीर निषेध स्थानिक जटपुरा गेट येथे करण्यात आला यावेळी जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले, महानगरमंत्री शुभम निंबाळकर, नगर महाविद्यालय प्रमुख शैलेश श दिंडेवार,रोहित खेडेकर,ऋषिकेश बनकर,मंदार झाडे,पराग दिंडेवार,कमलेश सहारे,प्रतीक अंगलवर, विशाल बुरडकर,संकल्प मारकडेशवर,निखिल पोहणे,दामोदर द्विवेदी यांची उपस्थिती होती

जनतेचे प्रतिनिधि म्हणून काम करणाऱ्या मंत्र्यांनी आलिशान एसी गाडीच्या बाहेर उतरुन विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारावे ही अत्यंत वाजवी व माफक अपेक्षा विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनासमोर केली होती.

ह्या मागणीला केवळ दूर सारल्या गेले नाही तर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य सरकारमधील मंत्री श्री.अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याच्या सूचना देणे ही केवळ लोकशाहीची पायमल्ली नाही तर ज्या महात्मा गांधींच्या अहिंसेची भलावण हे सरकार करत असते त्या अहिंसेला अपमानित करण्याचं काम उद्धव ठाकरे सरकार ने केले आहे.

इतिहास साक्षीदार आहे जी ज्या ज्या वेळेस लोकशाहीतील सामान्य जनतेचा आवाज आणि विशेषतः विद्यार्थी वर्गाचा आवाज दाबण्याचा व चिरडण्याचा प्रकार झाला त्या त्या वेळेला निरंकुश व भ्याड सत्तेच्या विरोधात असंतोष एकत्रित होऊन ती सत्ता उलथवून टाकण्याची सुरुवात झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here