ब्रम्हपुरी : तालुक्यातील वैनगंगा नदीला पूर आल्याने अनेक गावांना धोका

0
165

ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीला पूर आल्याने अनेक गावांना धोका

पुराचे पाणी गावात शिरले, मार्ग बंद, धान पिकेही बुडाली

ब्रम्हपुरी:

वैनगंगा नदीला पाणी झपाट्याने वाढत असल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले ) गावात पाणी शिरले आहे तर आवळगाव येथेही पुलावर पाणी चढल्याने गांगलवाडी ते मुडझा मार्ग बंद झालेला तर भाजीपाला धन शेतीचेही प्रचंड नुकसान झालेले आहे.
गोसीखुर्द धरणाचे पाणी विसर्ग होण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पाणी वेगाने वाढत असून नदी दुथडी भरून वाहत आहे नदी लागत असलेल्या नाल्या मुळे पाणी गावात शिरत आहे तर काही ठिकाणी छोटे मोठे नाले भरल्यामुळे शेतातही नदीचे पुराचे पाणी घुसले असल्याने धान पिक बुडाली असल्याने धान पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) गावात वैनगंगा नदीचे पुराचे पाणी शिरले आहे तर देऊळगाव ते कोल्हारी नाल्यावर पूर आल्याने मार्ग बंद झाला असून धान शेती पाण्याखाली आली आहे तसेच तालुक्यातील मुडझा मार्गावरील आवडगाव पुलावर पाणी चढल्याने गांगलवाडी मुडझा मार्ग बंद झालेला आहे वैनगंगा नदीला पाणी झपाट्याने वाढत असल्याने नाल्याना दाब येत असल्याने वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी नाल्यांद्वारे नदीकाठा लगत असलेल्या गावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here