किन्ही (चौगान) : महावितरणचे 33 केव्ही उपकेंद्र पुराच्या पाण्यात

0
86

 

ब्रम्हपुरी :

गेल्या दोन दिवसापासून गोसे खुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे उघडल्यामुळे चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

वैनगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर येऊन छोटया नाल्यांना दाब आल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव, अरेर नवरगाव, बेटाला, रनमोचन चौगान किनही या गावांमध्ये पाणी शिरले.

अशातच किनही चौगान येथे असलेल्या महावितरण च्या 33 केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले. उपकेंद्रात येणाऱ्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून तातडीने महावितरण ब्रम्हपुरी उपविभागाचे अधिकारी श्री लिखार यांचे मार्गदर्शनात सहाय्यक अभियंते श्री वंजारी, माहुरे, मुंगुले तसेच जनमित्र श्री थाटकर व नवघडे यांनी प्रसंगावधान राहून रात्रौ 1 वाजता जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण करून किन्ही उपकेंद्रातील वीज पुरवठा बंद करून तेथे पुराच्या पाण्यात अडकलेले कार्यरत कर्मचारी यंत्रचालक व सुरक्षा रक्षक यांना सुखरूप ठिकाणी हलविण्यात यश मिळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here