बल्लारपूर : पोलिसांनी केला 5 लाख 20 हजार चा दारूसाठा जप्त

0
88

बल्लारपूर पोलिसांनी केला 5,20,000 रु दारूसाठा मुद्देमाल जप्त : जुनोना येथील वन विभागाच्या चेक पोस्ट जवळ कारवाई

बल्लारपूर -अक्षय भोयर (ता,प्र)

बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत गुप्त माहीतीच्या आधारावर गुन्हे शाखा बल्लारपूर पथकामार्फत जुनोना येथील वन विभागाच्या चेक पोस्ट जवळ प्रोव्ही रेड करण्यात आली या संदर्भात पोलीस स्टेशन बल्लारपूर मध्ये अप क्र 574/2020 मदका 65(ई) 83 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याविषयीच्या अधिक माहितीनुसार जुनोना येथील वन विभागाच्या चेक पोस्ट जवळ मारूती सुझुकी ची अल्टो 800 कार मध्ये 8 खरड्याचे बॉक्समध्ये 800 नग देशी दारू मिळून आली याची अंदाजित किंमत 1,20,000/- रु असून 4,00,000 रु ची मारुती सुझुकी ची अल्टो 800 कार असा एकूण 5,20,000/- रु किमतीचा माल मिळून आला असून या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपी नामे 1)दुलचंद सहारे, 2)प्रभुचारण नायडू रा.मिंडाळा ता.नागभीड यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे यासंबंधीचा पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड व त्यांच्या चमू ने केली असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here