बल्लारपूर : शहरातील इंडिया -1 A – एटीम फोडण्याचा दोन इसमाचा अयशस्वी प्रयत्न!

0
105

बल्लारपूरातील इATM फोडण्याचा प्रयत्न : 2 आरोपींना अटक एटीएम मध्ये 17,30,000/-(सतरा लक्ष तीस हजार रु) कॅश असल्याचे सांगितले

बल्लारपूर  –  अक्षय भोयर (ता,प्र)

बल्लारपूर शहरातील इंडिया -1 A एटीम फोडण्याचा प्रयत्न 2 इसमाने केला मात्र बल्लारपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी वित्तहानी होण्याची घटना घडता घडता वाचली याविषयीच्या अधिक माहितीनुसार काळ रात्री डिव्हिजन गस्त दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक विनीत घागे, पोलीस शिपाई रंगारी व चालक सहायक फोजदार ढवस बल्लारपूर शहरात पेट्रोलिंग करत असताना.

मुख्य रस्त्यावरील इंडिया -1 A ATM जवळ 2 इसम संशयित रित्या फिरतांना दिसले तसेच त्यांच्या हातात सब्बल सारखे हत्यार दिसून आल्याने त्याचा पाठलाग केला असता एक आरोपी मोटर सायकने पळून गेला असता त्याचे गाडीचा सरकारी वाहनाने पाठलाग केला असता आरोपी नामे सूरज जाणबा दोडके वय – 28 वर्ष, रा.एसटी वर्कशॉप जवळ चंद्रपूर हा सापडला त्याला अधिक विचारपूस केली असता तो स्वतः व त्याचा साथीदार नामे जितेंद्र अरुण गुप्ता वय – 22 वर्ष, रा.खेडमरा जि. पाटणा, बिहार राज्य, हल्ली मुक्काम चंद्रपूर यास ताब्यात घेण्यात आले असून तक्रारदार यांनी सदर एटीएम मध्ये 17,30,000/-(सतरा लक्ष तीस हजार रु) कॅश असल्याचे सांगितले आहे याविषयीचा सदर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here