दोन वर्षां पासुन पगार नाही : वंचीत शिक्षिकेने गमावला जीव : संस्था चालकांवर कार्यवाहीची मागणी

108

मागील 26 महिन्यांपासून शिक्षक पगारापासून वंचीत…. शिक्षिकेने गमावला जीव…. संस्था चालकांवर कार्यवाहीची मागणी *
वर्धा व्हॅली इंग्लीश मिडीयम स्कुल रयतवारी येथील प्रकार
चंद्रपुर
शासनाच्या आदेशावरून जिल्ह्यातील शाळा महाविद्यालया बरोबरच कॉन्व्हेंट शाळा पूर्णपणे बंद आहेत.परंतु या आपत्तीजनक काळात कॉन्व्हेंट मध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॉन्व्हेंट संस्थाचालकां कडून वेतन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संस्थाचालकावर कार्यवाही करण्याची व थकीत वेतन आदेश देण्याची मागणी वर्धा वैली इंग्लिश मिडियम हायस्कूल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांचा कडे केली आहे.
स्थानिक वर्धा वैली इंग्लिश मिडियम हायस्कूल रैयतवारी कॉलेरी चंद्रपूर,येथील कॉन्व्हेंट मध्ये कार्यरत महिला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मागील २६ महिन्या पासून वेकोली प्रशासनने हेतुपुरस्सर वेतनापासून वंचित ठेवलं आहे.ही शाळा चालविण्यासाठी वेकोली व्यवस्थापणा कडुन वर्षा साठी १.५ लाख अनुदान प्राप्त होते.विद्यार्थी कडून शुल्क आणि प्राप्त अनुदान मधुन शाळेचा कारभार चालतो.मागील दोन वर्षा पासून स्थानिक वेकोली चंद्रपूर एरिया व्यवस्थापन कडून अनुदान देण्यात आले नाही.सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पी.फ सुद्धा कापण्यात आले नाही व संबंधित कार्यलयात भरण्यात आले नाही.
या संदर्भात उच्च न्यायालयाने सण २००९ मध्ये शाळा प्रबंधनला सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देण्याचे आदेश दिले होते परंतु शाळा व्यवस्थापन ने प्रशासनचे आदेशाचे पालन केले नाही.कोरोनाच्या काळात शासनाचे आदेश असताना सुध्दा वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे.याची तक्रार जिल्हाधिकारी चंद्रपूर व शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे परंतु आज पर्यन्त कोणतेही दखल घेण्यात आली नाही.त्या मुळे मागील २6महिन्या पासून वर्धा वैली इंग्लिश हायस्कूल रय्यतवारी कॉलरी चंद्रपूर कॉन्व्हेंट कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनवर उपासमारीचे संकट आले आहे.
याच विवंचनेत अर्चना इंगळे या शिक्षिकेचा 24 आगस्ट रोजी मृत्यू झाला, या शिक्षिका मागील 26 महिन्यांपासून उपासमारीचे संकट झेलत-झेलत शेवटी प्राणाला मुकली.
आता तरी प्रशासनाला जाग येईल काय..?
की परत इतर कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागेल.?