डॉ. सुनील टेकाम यांच्या कुटुंबियांना लवकरच आर्थिक मदत मिळणार

167

डॉ. सुनील टेकाम यांच्या कुटुंबियांना लवकरच आर्थिक मदत मिळणार

आमदार प्रतिभाताई धानोरकरांच्या मागणीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे सकारात्मक

चंद्रपूर :

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात योगदान देत कोरोना संकटाशी दोन हात करीत आहेत. काही दिवसपूर्वी डॉ. सुनील टेकाम आरोग्य अधिकारी उपजिल्हा रुग्णालय वरोरा या कोरोना योध्यांचा मुत्यू झाला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबियातील व्यक्तीना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली आहे. त्यांनी साकारात्मकता दर्शवित लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
जिल्ह्यात सुरवातीच्या काळात वरोरा येथे कोरोना रुग्ण मिळाला होता. त्यावेळी भीतीचे वातावरण असून देखील डॉ. टेकाम यांनी रुग्णांवर उपचार केले होते. त्यासोबतच अन्य रुग्णांवर देखील त्यांनी उपचार केले. यात अनेक रुग्ण देखील बरे झालेत. डॉ. टेकाम यांनी धीराने हि परिस्थिती हाताळली होती. कोरोना योध्या प्रमाणे त्यांनी रुग्णांवर उपचार केलेत. परंतु दुर्दैवाने या विषाणूची लागण त्यांना झाली. व त्यात लढताना त्यांचे दुःखद निधन झाले. कुटुंब प्रमुख गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. त्यांना या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. डॉ. सुनील टेकाम यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबियांवर व त्यांच्या पत्नीवर कोसळलेल्या संकटात त्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली. त्यात लवकरच निर्णय घेऊन सकारात्मक भूमिका घेत कुटुंबियांना दिलासा देणार असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.