पिपरीत कोरोना योध्यांच्या साडी, चोळी देऊन सत्कार : सरपंचांनी दिली आशा ताईंना अनोखी भेट

0
97

*सरपंचांनी दिली आशा ताईंना अनोखी भेट*

पिपरीत कोरोना योध्यांच्या साडी, चोळी देऊन सत्कार*

चंद्रपूर :

राजकारणात अनेक व्यक्ती आपल्याला दिसतात. परंतु एखादी पद सोडत असताना समाजाच काही देणं लागत याची जाणीव ठेवणारे फार कमी दिसत असतात. परंतु याला अपवाद पिपरी येथील पारस पिंपळकर ठरले आहेत. गावातील राजकारण बाजूला सारून गावाच्या विकासाकरिता तळमळीचा कार्यकर्ता त्याचा रूपात दिसत आहे. असे भावोद्गार भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे यांनी काढले. ते पिपरी येथील सरपंच पारस पिंपळकर यांचा कार्यकाळ ९ तारखेला संपत आहे. त्यानिमित्य घेण्यात आलेल्या निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नकोडा, मारर्डा जिल्हा परिषद क्षेत्रातील अशा ताईंना कोरोना काळात काम करीत असल्याबद्दल मावळते सरपंच पारस पिंपळकर यांच्याकडून साडी व सॅनिटायझर देऊन या कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी, इंपायर चे संस्थापक विजय बदखल, सरपंच पारस पिंपळकर, पोलीस पाटील व जिल्हा परिषदेतील अशा वर्करची उपस्थिती होती.

पुढे बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे म्हणाले कि, ग्रामीण भागात अनेक समस्या असतात. परंतु त्या सोळविण्यासाठी एक तळमळ व राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करावे लागत. एक मोठा नेता होण्याची क्षमता असून राजकारणात येणाऱ्या युवकांसाठी पारस पेरणादायी सरपंच ठरेल. त्यासोबतच हे पद शेवटच नसून येत्या काळात अनेक मोठी पदे पारस नक्की भूषवलं अशा शुभेच्या त्यांनी दिल्या.

राजकारणात महिलांच्या कामाची दखल घेताना राजकीय व्यक्ती फारसे समोर येताना दिसत नाही. परंतु सरपंच पदाचा कार्यकाळ संपत असताना कोरोना योध्यांच्या सन्मान साडी देऊन दिला. हा दुळमिळ प्रसंग असून सर्वानी हा आदर्श घेण्याची गरज असल्याचे मात महिला व बालकल्याण सभापती नितु चौधरी यांनी व्यक्त केले.

सरपंच पदावर राहून गावाचा विकास कसा करता येतो. याचे उत्तम उदाहरण सरपंच पारस पिंपळकर यांनी दाखवून दिले आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना मागील आठ वर्षात पिपरी गावाचा चेहरा मोहरा त्यांनी बदलविला आहे. मोठ्या प्रमाणात चौफेर विकास त्यांनी केला आहे. पुढील काळात असाच प्रकारे कार्य करीत मोठी जबाबदारी देण्याची विनंती इन्स्पायर चे संस्थापक विजय बदखल यांनी भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे यांना केली आहे. पारस सारखे युवा सरपंच प्रत्येक गावात राहिल्यास महात्मा गांधींचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार असल्याचा विश्वास विजय बदखल यांनी व्यक्त केला. यावेळी अन्य मान्यवरांनी आपली मते मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here