माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे यांचेवर खंडणीचा गुन्हा दाखल : लिलावधारक रेती व्यवसायिकांना त्रास देणे पडले महागात

103

 

चिमूर

तालुक्यातील मोटेगाव येथील उमा नदी लगत रेती साठ्याचा लिलाव कायदेशीर झाला असतांना विजय झाडे व त्यांच्या सहकाऱ्यांना लिलाव मिळाला असताना कांग्रेसचे माजी जीप सदस्य विलास डांगे हे विनाकारण खोट्या तक्रारी करून त्रास देत असताना रेती घाटावर येऊन एक लाख रुपयांची खंडणी ची मागणी करीत अन्यथा पाहून घेण्याची धमकी दिल्याने रेतीलिलावधारक विजय झाडे यांच्या तक्रारी वरून माजी जीप सदस्य विलास डांगे यांचेवर चिमूर पोस्टे नी भादवी ३८४, ३८५ ,५०६ गुन्हा दाखल करण्यात आले.

मोटेगाव येथील रेती घाट हा महसूल प्रशासन कडून कायदेशीर रित्या विजय झाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेती घाट लिलाव घेतला. एक महिन्यांपूर्वी रेती घाटावर येथील कांग्रेस चे माजी जीप सदस्य विलास डांगे आले असतांना त्यांनी रेती घाटाचे फोटो काढले आणि तीस हजार रुपयांची मागणी करीत तुझा घाट कसा चालतो ? मी बघून घेईन तू जर पैसे दिले नाही तर मी तुला पाहून घेईन अशी धमकी देऊन निघून गेले .त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रकाश झाडे,किशोर मुंगले यांचे सोबत विलास डांगे यांचे घरी जाऊन २५ हजार रुपये दिले आणि उर्वरित पाच हजार रुपये नंतर देतो अशी तडजोड झाली .
त्यानंतर दि १ सप्टेंबर २० सायंकाळी अंदाजे ४.३० वा चे सुमारास खुटाळा मोटेगाव रेती घाटाचे रायल्टी रेकार्ड जमा करण्यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे जात असतांना तहसील कार्यालय गेट जवळ भेट झाली सहज विचारणा केली असता विलास डांगे यांनी पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली अन्यथा मी वर पर्यत तक्रार करून रेती घाट बंद करण्याची धमकी दिली .तेव्हा चेक ने देतो किंवा बँक खात्यावर जमा करून देतो असे सांगण्यात आले .तेव्हा विलास डांगे यांनी नगदी एक लाख रुपयांची मागणी केली आणि धमकी देत निघून गेला घटनेच्या वेळी गोलू भरडकर अमित जुमडे उपस्थित होते सदर विलास डांगे यांनी दिलेल्या खंडणी धमकी वरून विजय झाडे यांच्या तक्रारी वरून चिमूर पो स्टे विलास डांगे यांचे वर भांदवी ३८४,३८५ ५०६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास डांगे यांचे तक्रारी वरून रेतिघाट मालक विजय झाडे ,त्याचे बंधू आणि इतर दोघांवर चिमूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी एकमेकांच्या तक्रारी केल्या आहेत यात पोलीस तपास सुरू आहे