घुग्घुस : शिवसेना उपशहर प्रमुख योगेश भांदककर यांच्या वर दारु तस्कराचा हल्ला

0
96

*घुग्घुस येथील शिवसेना उपशहर प्रमुख योगेश भांदककर यांच्या वर दारु तस्कराचा हल्ला*

बुधवारला रात्री ७:३० वाजता दरम्यान घुग्घुस येथील शिवसेना उपशहर प्रमुख योगेश भांदककर (३०) रा. गांधीनगर हे आपल्या आई सोबत चंद्रपुर येथुन वाहनाने परत घरा जवळ आले असता. घरा जवळ वाहन लावत असतांना त्यांच्याच घरा जवळ राहनारा दारु तस्कर राजु बानय्या कटकुरी तिथे येऊन येथे तु आपले वाहन लावु नको तु इथे वाहन लावतोस त्यामुळे माझ्या घरी ग्राहक येत नाही असे म्हणुन काॅलर पकडुन धक्काबुक्की केली व मारहान केली तुमचे कोणते नेते आहे पोलीस माझे काही करत नाही असे म्हणुन अश्लिल शिवीगाळ केली.

शिवसेना उपशहर प्रमुख योगेश भांदककर यांनी आपल्या आई व शिवसेना शहर प्रमुख बंटीभाऊ घोरपडे यांच्या सोबत रात्री घुग्घुस पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दिली. तक्रारीवरुन कलम ३२३,५०४,५०६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घुग्घुस येथील दारु तस्कर राजु बानय्या कटकुरी (२८) रा. गांधीनगर, यांच्या वर दारु तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहे.

घुग्घुस शिवसेना उपशहर प्रमुख योगेश भांदककर यांच्यावर दारु तस्कराने हल्ला केल्याने त्यांचे कुटुंब भयभीत झाले आहे. तसेच शेजारील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारु तस्करावर कडक कारवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here