वैनगंगा नदीला आलेला कृतीम पूरास कारणीभूत व शेतकऱ्यांच्या हजारो कोटीच्या पिकाच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या च्या विरोधात कडक कारवाई करा

0
60

वैनगंगा नदीला आलेला कृतीम पूरास कारणीभूत व
शेतकऱ्यांच्या हजारो कोटीच्या पिकाच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या च्या विरोधात कडक कारवाई करा

भा. क. प.ने केली पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी

ब्रम्हपुरी प्रतिनिधी : –

गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण दरवाजे अचानक उघडला गेल्याने वैनगंगा नदीला आणल्या गेलेला कृत्रिम पूर आला.त्यामुळे नागपूर, भंडारा ,गडचिरोली ,चंद्रपूर जिल्ह्यातील गंगा नदी काठावरील गावातील शेतकऱ्याचे हजारो कोटी रुपयां च्या पिकांच्या झालेल्या नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या कडाक कारवाई करून बाधित नागरिकांना, व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या मागणीला घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे यांनी दी.२ ला उपविभागीय कार्यालयामार्फत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी व मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
पूर्व विदर्भात असलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला १९९४ नंतर प्रथमच असा मोठा पूर आला .या महाभयानक पुरामुळे भंडारा जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली तालुक्याला या पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला असून सामान्य जनजीवन विस्कळित झाले असून मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.पुराचा फटका बसलेल्या अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न स्थनिक प्रशासनाने केले असले तरी पुरामुळे हजारो नागरिकांच्या घरात पाणी घुसले असून घरातील जीवनोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून प्रशासन प्रति नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाले आहे. सदर धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला असला तरी जिल्ह्यातील शासन प्रशासनाने या पुरला गांभीर्याने घेतले नसल्यामुळे सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.असा आरोप निवेदनात कॉ.विनोद झोडगे यांनी केला आहे.
सदर महापुरास मध्यप्रदेश राज्यात व भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या कारण दिले जात असले आणि संजय सरोवरातील अतिरिक्त पाण्याचे विसर्ग गोसेखुर्द धरणात करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी संजय सरोवराच्या प्रशासनाशी किंवा मध्यप्रदेश सरकार योग्य समन्वय साधून सदर महापूर टाळता आले असते. मात्र अशा प्रकारचे कोणतेही समन्वय नसल्याचे सिद्ध होत असल्याने सदर महापुरामागे मोठे कट कारस्थान आहे की काय? अशी शंका नागरिक करीत आहेत. मध्यप्रदेश राज्यात झालेल्या अतिवृष्टीची आणि त्यामुळे संजय सरोवरात जमा होणार्‍या पाण्याची आकडेवारी लक्षात घेऊन गोसेखुर्द धरणाची विसर्ज यापूर्वी सुरू न करता पाणी सोडणार अशी आठ दिवसापासून नुसती चर्चा करण्यात येत होती संजय सरोवराचा विसर्ग करण्यात आल्यानंतरही गोसेखुर्द प्रशासन कोणाच्या सांगण्यावरून निर्धास्त होऊन धरणाच्या क्षमतेपेक्षा ही अधिक पाणी जमा करीत होते तसेच भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी बाबत हवामान विभागाने अलर्ट दिला असताना गोसेखुर्द विसर्ग त्यापूर्वी सुरू न करता आठ दिवसापेक्षा अधिकचा उशीर होण्यास कारणीभूत कोण ? गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्याबाबत अलर्ट जारी केल्यानंतरही चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने सदर विसर्गाच्या पुराने बाधित होण्याची शक्यता असलेल्या गावातील कुटुंबांना त्यांच्या अन्नधान्य कपडे सामानासह ह्याआधी सुरक्षित स्थळी का हलवले नाही? हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची गरज का भासली,? जिल्ह्यात पाऊस थांबला असताना संपूर्ण 33 दरवाजे उघडून वीसर्ग करण्याची गरज का भासली? धरणाला धोका होता तर सुरु असलेल्या विसर्ग लोकप्रतिनिधी च्या सांगण्यावरून अचानक कमी का करण्यात आला? धरणातील पाणी आटले का काही कटाचा भाग आहे? या मुद्द्यावर चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी तसेच या कृत्रिम महापुराने नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी,शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत ,ज्यांचे घरे पडली त्यांना घरकुल द्यावे ,ज्यांचे घरातील अन्न ,कपडे ,भांडे आदींचे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना वीस हजाराची मदत मदत द्यावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनातून मागणी केली आहे. निवेदन देताना भा. क. प.नेते विनोद झोडगे, मिलिंद भंन्नारे ,श्रीकांत पारधी, शरद खेडकर ,नितेश चट्टे, चक्रधर ठोंबरे,देविदास ठोंबरे इत्यादी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here