घुग्घुस : निकृष्ठ दर्जाचा भोंगळ कारभार ; ग्रामपंचायतचे मूक मौन

0
91

निकृष्ठ दर्जाच्या भोंगळ कारभाराला ग्रामपंचायतचे मूक संमती

घुग्घुस : शहरात नुकतेच अचानकपणे व अगदी घाईघाईने कोरोना संसर्ग काळात घुग्घुस येथील सहा वॉर्डात विविध ठिकाणी विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.

सध्या परिस्थितीत घुग्घुस येथे जागो – जागी सिमेंट रस्ते, नाली बांधकाम शुरू करण्यात आलेले आहे.
मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून तातळीने बिल उचलण्या करिता घाईघाईने हे कामे केल्या जात असल्याचे आरोप नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
अमराई वॉर्ड नंबर 01 मधील रस्त्याचे काम अगदी निकृष्ट असून सिमेंट रस्त्यावर पाणी देखील टाकल्या जात नाहीत.
उत्खनन करण्यात आलेली माती रस्त्यावर व बाजूला टाकण्यात आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
याच वॉर्डात ग्रामपंचायत तर्फे नळ पाईप लाईनचे काम पक्का रस्ता फोडून करण्यात येत आहे.
परत त्याच रस्त्यावर सिमेंट करणं करून फसवेगिरी शुरू आहे.
आज टाकलेले सिमेंट दुसऱ्याच दिवशी निघत आहे.
मात्र या भोंगळ कारभाराला ग्रामपंचायतची मूक संमती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here