अभिनेत्री कंगना रणावतच्या पुतळयाचे दहन

0
135

मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर आहे का, मला मुंबई पोलिसांची भीती वाटते अश्या महाराष्ट्रविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याने अभिनेत्री कंगना राणावत अडचणीत आल्या आहे, राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने आंदोलने सुरू आहे.
शिवसेना जिल्हा चंद्रपुराच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात अभिनेत्री कंगना रणावतच्या पुतळयाचे दहन शिवसेना जिल्हा कार्यालयसमोर करण्यात आले. ज्या मुम्बई मधे राहून पैसा ,प्रसिद्धि आणि नाव कमविले त्या मुम्बईची आणि मुम्बई पोलिसांची बदनामी कारित आहे आता तर कंगना रानावतच्या पुतळा जाळला यानंतर तिने महाराष्ट्र आणि मुम्बई पोलिसांची माफी मागितली नाही तर यानंतर कंगना रानावतचे चित्रपट चंद्रपुर मध्ये प्रसिद्ध होऊ देणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटील, राहुल विरुटकर, आशिष कावटवार, शिवसेना महिला आघाडीच्या भारतीताई दुधानी, मायाताई पटले, वर्षाताई कोठेकर, कुसुमताई उदार, शोभाताई वाघमारे, अशोक चिरखरे, हर्षल कानमल्लीवार, सोनू ठाकुर, हेमराज बावणे, करण वैरागड़े, सिकंदर खान, वसीम खान, देवा इंगोले, विक्रांत सहारे, अक्षय अंबिरवार, विश्वास इटनकर, अजय मोटवानी, राहुल पायघन, सुरेश नायर, व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here