अवैध देशीदारू किंग दीपक ट्रेङर्सशी पोलिसांचा ‘पवित्र रिश्ता’ : भालर वसाहतीतून खुलेआम होती दारूचा पुरवठा

0
93

 

चंद्रपूर / यवतमाळ
घरात दीपक जन्माला यावा आणि त्याने घराण्याचे नाव रोशन करावे, असे जन्मदात्यांना वाटत असते. पण, इथे तर उलटेच घङतेय. देशीच्या नशेत पार बुङालेल्या दीपक ट्रेङर्सने पोलिसांशी ‘पवित्र रिश्ता’ जोङला आणि भालर वसाहतीतून खुलेआम पुरवठा होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात WCLची भालर वसाहत आहे. याच वसाहती जवळ दिपक ट्रेडर्स ही देशी दारुची भट्टी आहे. मागील अनेक वर्षापासुन याच देशी दारुच्या भट्टीतून अवैध दारुचा पुरवठा चंद्रपूर जिल्ह्यात केला जात आहे. आजपावतो घुग्घुस, पडोली, रामनगर, एलसीबी व उत्पादन शुल्क विभागाने यांच्या हस्तकावर डझनभर कारवाह्या केल्या.
परंतु भालरच्या देशी दारु भट्टीतून पुरवठा करणा-या दिपक ट्रेडर्सवर पोलिसांची विशेष मेहरनजर का ?
हा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
यांचाच खंदा समर्थक अवैधरित्या दारु तस्करी करणारा राजुअन्ना पल्ले हे यांच्यावर अनेकवेळी पोलीस कारवाई झाली. मात्र ती फक्त देखाव्या पुरतीच असून, हा कुख्यात दारू तस्कर नेहमीच मोकाटच असतो. कारण, सोबत असलेला अस्सल देशी रिश्ता.
काही दिवसापुर्वी पडोली, रामनगर, घुग्घुस, एलसीबी व उत्पादन शुल्क विभागाने लाखों लिटर अवैध दारु पकडली आहे अनेक आरोपींना अटक करण्यात आली. ह्या प्रकरणात भालर येथील दिपक ट्रेडर्सच्या देशी दारुच्या भट्टी तुन अवैध रित्या देशी दारु पुरवठा केला गेला परंतु दिपक ट्रेडर्सचा संचालकावर मात्र आता पर्यंत कारवाही केली गेली नाही. हे रहस्य अजूनही गुलदस्त्यातच आहे.
जनतेच्या मनात नेहमीच एक प्रश्न सतावत असतो ” ये रीश्ता क्या कहलाता है ”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here