पूरग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा : खासदार बाळू धानोरकर

0
101

*पूरग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा : खासदार बाळू धानोरकर*

चंद्रपूर : मागील पाच महिन्यापासून सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विष्काळीत झाले आहे. मोठ्या संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे. त्यात गोसीखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावात कृत्रिम पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झालेले आहे. राज्य शासनाने थोडा दिलासा देत चंद्रपूर जिल्ह्याकरिता पाच कोटी निधी जाहीर केला आहे. ती मदत लाभार्थ्यांना मिळण्याकरिता शेतीच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी कृषी व महसूल विभागाला दिल्या आहे.

जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सावली, मूल, पोंभुर्णा यासह अन्य ठिकाणी शेकडो गावांना पुराचा फटका बसला आहे. अनेकांची घरे पडली. आता पूर ओसरला. मात्र पुरानंतर येथील सर्वसामान्यांपुढे जगण्याचा मोठा संघर्ष उभा ठाकला आहे. त्यामुळे या पूरग्रस्तांना तात्काळ पंचनामे देऊन नुकसान भरपाई देण्याची आग्रही मागणी खासदारांनी केली आहे.

त्यासोबतच आरोग्य विभागाने तातडीने या पूरग्रस्त गावांतील लोकांच्या आरोग्य तपासण्या करण्यासाठी कॅम्प लावावेत. त्यांना औषोधोपचारासह मास्क, सॅनिटायझर पुरवावे, पाणीपुरवठा विभागाने तातडीने शुद्ध पाणी नागरिकांना द्यावे. या भागातील जनावरे लंम्पिने बाधित आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण शिबीर घेण्याचे नियोजन करावे, परिसरात निर्जंतुकीकरण करावे असे निर्देश दिले.

हा दुहेरी संकटाचा काळ असून या मध्ये सर्वानी सोबत येऊन लढल्यास हे संकट निश्चितच दूर होईल. असा विश्वास खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here