चंद्रपूर – जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता लॉकडाउन होण्याची शेक्येता ?

0
85

चंद्रपूर – जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता सध्या लॉकडाउन सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, परंतु केंद्राकडून लॉकडाउन ची परवानगी न मिळाल्याने तो रद्द करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दररोज 200 च्या कोरोना बाधित वाढत असल्याने यावर नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे, नागरिकांनी स्वतः शासनाचे नियम पाळायचे आहे.
परंतु काही नागरिक तोंडावर मास्क न बांधता शहरात फिरत आहे, बाजारात गर्दी वाढत असल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.
काही राजकीय व लोकप्रतिनिधी सुद्धा नियमांचे धिंडवडे उडवीत आहे, पण याचा परिणाम रुग्णांच्या वाढत्या संख्येत दिसून येतो.
आता जिल्ह्यात नागरिकांच्या सहकार्याने जनता कर्फ्यु लावण्याची प्रशासनाची योजना आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
जनता कर्फ्यु साठी आधी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे, पहिला जनता कर्फ्युचा टप्पा हा 3 दिवसांचा जाहीर करू, नंतर परिस्थिती नुसार पुढचे पाऊल उचलण्यात येईल, ह्या कर्फ्युत सर्वात महत्वाचे म्हणजे जनतेचे सहकार्य असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here