दारूबंदी : देशी दारूचा अवैध पुरवठा आणि राजू अण्णा टीमवर्क !

0
88

घुग्गुस –

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात असलेल्या वेकोलीच्या भालर वसाहती मधून देशी दारूचा अवैध पुरवठा राजरोसपणे होत आहे, हा पुरवठा मात्र शिस्तीने होत आहे बर का, कारण हा पुरवठा करण्यासाठी पुरवठादार राजू अण्णा यांनी 15 जणांची टीम बनवली आहे, आणि ह्या टीमवर्क मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील देशी दारू भालर वसाहतीमधून येत आहे.
या वसाहती जवळ दीपक ट्रेडर्स नामक देशी दारूची भट्टी आहे, या भट्टीतून अवैध देशी दारूचा पुरवठा चंद्रपुरात केल्या जातो, इतकेच नव्हे तर यासाठी एकमेव मार्ग म्हणजे घुग्गुस जवळील बेलोरा पूल याचा उपयोग केला जातो.
मात्र ही दारू कोणताही पोलीसवाला अडवीत नाही हे विशेष.
राजू अण्णा हा आपल्या 15 मुलांच्या टीमला ही देशी दारू कोणत्या मार्गे व कुणी अडविल्यास काय करायचे याची खातरजमा करतात.
आश्चर्याची बाब म्हणजे हा संपूर्ण दारू साठा घुग्गुस मार्गाने चंद्रपुरात दाखल होतो.
घुग्गुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार गांगुर्डे यांचं या अवैध दारु वाहतुकीवर व अवैध दारू नियंत्रणात मुळीच लक्ष नाही.
आज घुग्गुस शहरात अनेक ठिकाणी अवैध दारूचा पुरवठा होत आहे, त्यावर पोलीस प्रशासनानी त्या अन्नाचा माल 24 घंटे चौकन्ना राहून पकडण्यात यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here