चोरी पडली महागात : चोरी करायला गेला वेकोलीच्या द्वारी ; अन.. जीव गमावून बसला देवा घरी

0
98

 

वेकोलि वणी क्षेत्रात निलजई
साऊथ बंद कोळसा खदान मधील घटना

घुग्घूस :

वेकोलिच्या कोळसा खदान मध्ये दोन युवक शुक्रवार दिनांक 4.सप्टेंबर ला रात्री निलजई साऊथ या वेकोलि च्या कोळसा खदान मध्ये केबल चोरी करण्यासाठी गेले असता त्यानी निलजई साऊथ या बंद खदान मधील पोल वरील चढत केबल कापून चोरी करण्यासाठी दोघांपैकी शेख जावेद वय 19वर्ष रा खरबडा वस्ती वणी हा पोल वर चढला त्याने पेंचीसनी केबल कापण्याच्या तयारीत असतांना जिवंत तारेचा स्पर्श लागून तो पोल वरून खाली फेकल्या गेला व जागेवरच मरण पावला ही 33 केवि ची जिवंत लाईन नायगाव खदान मध्ये एच ओ ई या माती कंपनीत विधुत पुरवठा करण्यासाठी जोडली आहे व बंद खदान मधील विधुत पुरवठा हा बंदच केला आहे या ठिकाणी चोरांनी धोका खाल्ला व जीव गमावून बसला. आपला सहकारी हा विद्युत करंट लागून मरण पावला हे लक्षात आल्यावर चोराच्या साथीदार निवांन शेख वय 25 यांची रा अमरावती व हल्ली मुक्काम खरबडा बस्ती वणी या चोराचा साथीदार पार घाबरून गेला व सरळ शिरपूर पोलीस स्टेशनं. ता वणी. जी यवतमाळ या पोलीस स्टेशनं मध्ये जाऊन आपबीती सांगितली ही घटना दि चार सप्टेंबर च्या रात्री साडेआठ च्या दरम्यानची आहे लगेच ही बातमी वाऱ्यासारखी वेकोलि निलजई परिसात पसरली वेकोलीचे सुरक्षा निरीक्षक रमेश यादव यांनी सुद्धा या प्रकरणाची रीतसर तक्रार शिरपूर पोलीस स्टेशनं ला दिली शिरपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनिल राऊत याच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस स्टेशनं चे कर्मचारी यांनी निवांन शेख याला ताब्यात घेऊन घटना स्थळ गाठले व शेख जावेद या मृतकाचे प्रेत ताब्यात घेऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता वणी. जी यवतमाळ येथे पाठवून प्रेत मृतकाच्या परिवारास सोपविले व पुढील तपास शिरपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शना खाली शिरपूर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here