घुग्घुस : WCLच्या राजीव रतन क्षेत्रीय इस्पितळातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

0
100

 

घुग्घुस WCL राजीव रतन रुग्णालयातील प्रकार

घुग्घुस :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका ह्या कोरोना संक्रमित मिळाल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांत दहशत निर्माण झाली असतांना आता WCLच्या राजीव रतन क्षेत्रीय इस्पितळातील 04 कर्मचारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे माहिती मिळाली असून राजीव रतन क्षेत्रीय इस्पितळ हे परिसरातील वेकोलिचे सर्वात मोठे इस्पितळ असून हजारो रुग्ण या ठिकाणी उपचारा करिता येत असतात त्यामुळे इस्पितळाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मागील तीन दिवसापूर्वी सुद्धा या इस्पितळातील एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने वेकोलि परिसरात खळबळ उडाली होती. इस्पितळातीलच कर्मचारी कोरोना बाधित निघाल्यामुळे तसेच एक इस्पितळातील उपचार घेत असलेला पेशंट सुद्धा पॉझिटिव निघाल्याने या इस्पितळात उपचार घेणाऱ्या तसेच इतर वेकोलिच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबिया मध्ये दहशत निर्माण झाली आहे.

परत यात पुन्हा या एका रुग्णाची भर पडल्याने या इस्पितळातील बाधित कर्मचाऱ्यांची संख्या तीन वर पोहोचली आहे .सदर दोन्ही कर्मचारी हे लैब टेक्निशियन पदावर कार्यरत असल्याचे तसेच संक्रमित रुग्णला नागपुर येथे पुढील उपचारा साठी हलवल्याचे वेकोलि राजीव रतन इस्पितळ प्रशासनाकडून कळते.
या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असून त्यांची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मात्र विषय एवढा गंभीर असून सुद्धा वेकोलि प्रशासनाने संपूर्ण इस्पितळ सील न करता फक्त लैब परिसर केलेला आहे तसेच हा परिसर सतत तीन दिवस पर्यंत सैनीटाइजर ने स्वच्छ करण्यात येणार असल्याचे कळते. परिसरात इतर कर्मचारी तसेच रुग्णांना जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे कळते .हा सर्व हलगर्जी प्रकार बघता वेकोलि परिसर तथा इस्पितळ कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कोरोना चा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
याव्यतिरिक्त सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी एका विभागाच्या HOD च्या सन्मानात स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार याठिकाणी होणार असल्याचे कळत आहे.
जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा कहर होत असताना अश्या आयोजनाचे औचित्य तरी काय असा प्रश्न जनते तर्फे विचारल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here