विवीध समस्यांकडे,प्रहारने निवेदनातुन वेधले पालकमंत्र्याचे लक्ष

0
104

विवीध समस्यांकडे,प्रहारने निवेदनातुन वेधले पालकमंत्र्याचे लक्ष

चिमूर:-

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार शनीवारला चंद्रपूर दौर्यावर आले असता,प्रहार जनशक्ती पक्ष चीमूर यांच्या मार्फत तालुक्यातील विवीध समस्या पालकमंत्री यांच्या नीदर्शनास आणून दिल्या.
यात,सोयाबीन पीकाची अतीवाढ झाल्यामुळे व विषाणुजऩ्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तालुक्यातील सोयाबीन पीकाला शेंगा लागल्या नाही,तरी एकरी 20,000रु. आर्थीक मदत देण्यात यावी.
तालुक्यातील सावरी य़ेथील प्रां.आरोग्य केंद्राच्या ऩवीन ईमारतीचे बांधकाम पुर्ण होऊन एक वर्ष लोटले तरी प्रा.आरोग्य केंद्र नवीन ईमारतीत हलवले नाही,जुनी ईमारत ही तुटपुंज्या जागेत आहे व ती जीर्ण झाली आहे,त्यामुळे रुग्णांचा ईलाज करतांना अडचण निर्माण होत आहे,तरी प्रा.आरोग्य केंद्र नवीन ईमारतीत हलवावे.
रमाई आवास योजनेचा नीधी एक वर्ष झाले लाभार्थ्यांना मीळाला नाही,पावसाळ्यात कुठे राहणार याकरीता लाभार्थ्यांनी व्याजाने रक्कम काढुन घराचे बांधकाम पुर्ण केले परंतु अद्यापी नीधी मीळाला नाही तरी त्वरीत नीधी वीतरीत करण्यात यावा.
नीयमीत कर्ज भरणार्या शेतकर्षांना महात्मा फुले क्रुषी कर्जमाफी योजने अंतर्गत 50,000 रू.प्रोत्साहन रक्कम मिळणार होती,पण ती सुद्धा मिळाली नाही तरी त्वरीत खात्यावर जमा करण्यात यावी.
ओबीसी प्रवर्गातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी ओबीसी महामंडळा अंतर्गत एक लाख रू.कर्ज देण्यात येते,परंतु त्याकरीता जाचक अटी असल्यामुळे जसे सातबार्यावर बोझा चढवणे,दोन जमानतदार मागतात,तरी या अटी शीथील करुन शासनाने स्वता हमी घेऊन कर्ज देण्यात यावे.
अशा वीवीध मागण्या निवेदनातुन पालकमंत्र्याकडे करण्यात आल्या,यावेळी प्रहार सेवक शेरखान पठाण,सचीन घानोडे,प्रशांत मेस्राम,गजानन उमरे ऊपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here