वसुलनिस : संजय सोनारकर यांना 1500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

0
89

भद्रावती – शासकीय योजनेअंतर्गत बांधकाम केलेल्या शौचालयाच्या अनुदानाची रक्कम देण्याकरिता माजरी ग्रामपंचायत मधील परिचर/ वसुलनिस संजय सोनारकर यांना 1500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
तक्रारदार हे माजरी येथील रहिवासी असून तक्रारदार यांनी शासकीय योजनेतून घरगुती शौचालयाचे बांधकाम केले त्यासाठी शासनाकडून बांधकामासाठी लागणारे अनुदान येणे होते त्या अनुदानाचा धनादेश लवकर देण्यासाठी परिचर सोनारकर यांनी तक्रारदार यांना2 हजार रुपयांची लाच मागितली परंतु तक्रारदार यांना पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी याची तक्रार चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे केली.
चंद्रपूर लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांनी सर्व बाबीची खातरजमा केल्यावर सापळा रचून सोनारकर यांना 1500 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.
या कारवाईमुळे माजरी ग्रामपंचायत कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.
शासकीय व खाजगी कामासाठी कुणीही नागरिकांना लाच मागितल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here