अवैध सावकारी करणाऱ्या महिलांवर कारवाईची मागणी*

0
87

*अवैध सावकारी करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्याची मागणी*
चंद्रपूर
सामाजिक सेवा करण्याच्या नावावर येथील काही प्रतिष्ठित व राजकीय वजन असणाऱ्या महिलांनी अवैध सावकारीचा धंदा राजरोसपणे सुर केला असून कोरोना सारख्या काळात ज्या महिलांनी कर्ज घेतलेल्या पैशाचे व्याज व मुद्दल वेळेवर न देणाऱ्या महिलांन विरुद्ध या प्रतिष्ठित महिलांनी बडगा उभारला असून बदनामी व जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे सर्रास प्रकार सुरू केले आहेत. एवढेच नाहीतर प्रसंगी गावगुंडांना पाठवण्यांचे प्रकार सुध्दा प्रकाशात आले असून यामुळे एका कर्जदार महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते .यामुळे येथील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर या घटनांमुळे खळबळ माजली आहे.
सद्यस्थितीत सर्वत्र कोरोनाचे सावट आहे उद्योग,व्यापार व कारखाने सुरु नसल्यामुळे रोजगाराची वाट लागली आहे. अशामध्ये काही महिलांनी रोजगार गेल्यामुळे काही खाजगी सावकारी करणाऱ्या महिलांना कडून व्याजाने घेतलेले पैसे वेळवर परत कुरु शकल्या नाहीत .शासनाच्या नियमानुसार कर्जावर व्याज वार्षिक १८%टक्के पेक्षा जास्त व्याजाची आकारणी करता येत नाही, परंतू अवैध सावकारी करणाऱ्या महिला १०℅टक्के पेक्षा अधिक मासिक व्याज दर आकारून अन्याय करत असून गरीब महिलांची पिळवणूक करण्यात येत आहे.
नुकतीच कर्जाऊ रक्कम घेतलेल्या एका गरजू महिलेला वेळेवर व्याज व मुद्दल भरू न शकल्यामुळे त्या महिलेला अवैध सावकारी करणाऱ्या महिलांनी गुंडा मार्फत धमकी दिली .त्यामुळे त्या कर्जदार महिलेच्या मनावर मानसिक ताणवात आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुध्दा केला.
सध्यस्थितीत चंद्रपूर शहरात व विशेष करून करून ग्रामीण भागात अवैध सावकारी वाहेमाप व्याज घेणाऱ्या महिलांची संख्या वाढली असून यांच्या व कर्ज वसुली साठी धमकी देण्याच्या प्रकारात तुलनात्मक वाढ झालीली आहे.खास करून कोरोनाच्या काळात याचे अमाप पीक आलेले आहे.अशा प्रकारचा अवैध व्याजाचा धंदा करून गरजू महिलांचे शोषण करून धमक्या देऊन आत्महत्येस बाध्य करणाऱ्या महिलां विरुद्ध अवैध सावकारी कायद्यांतर्गत दोषी महिलांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे .
जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी करण्यात आले असताना की ,कोरोना काळात कोणीही वसुलीचा तकादा लावू नये असे असताना सुध्दा असे प्रकार राजरोसपणे घडू लागले आहेत. लोक शर्मे व भीती पोटी तक्रार करण्या करिता पुढे येत नाही याचाच फायदा हे अवैध सावकार घेतात .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here