घुग्घुस : भंगार मोहल्यातुन १७ पेटी देशी दारु जप्त

89

 

१ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त

घुग्घुस येथील लोखंडी पुलाजवळील भंगार मोहल्यातील एका उभ्या नादुरुस्त चारचाकी वाहनाच्या खाली १७ पेटी लपवुन ठेवल्याची गुप्त माहिती चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळताच मंगळवारला रात्री २ वाजता दरम्यान भंगार मोहल्यात धाड टाकुन १७ पेटी देशी दारु जप्त केली. १ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घुग्घुस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी राजन्ना, आकाश व अविनाश रा. भंगार मोहल्ला, घुग्घुस यांना अटक करण्यात आली आहे.

हि कारवाही पो.नि. ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोहवा. संजय अतकुलवार, धनंजय करकाडे, गोपाल अतकुलवार, प्रशांत नागोसे, अमोल धंद्रे, रविंद्र पंधरे यांनी केली.