कृषिकन्यानी प्रात्यक्षिकाद्वारे केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

0
101

*नांदा फाटा*
तालुक्यातील ग्राम नांदा फाटा येथील कृषी कार्यानुभव कार्यक्रमतर्गत फळझाड लागवड आणि तंत्रज्ञान मोहीम हाती घेऊन कृषी महाविघालयातील कृषिकऱ्यांनी उत्कृष्टपणे ग्राम नांदा फाटा येथील शेतकऱ्याच्या शेतावर राबविली
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या मारोतराव वाडफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथे बोर्डाक्स मिक्सर फळझाडावर कशा पद्धतीने करावी ,त्याची गरज इत्यादी बद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले.
याचा कीड संवर्धन तथा खोड कुजणे, मूळकोज यासारख्या किडी व रोगापासून फडझाडांना संरक्षण कबच प्राप्त होते व रोगापासून फडझाडाचे संवर्धन होईल असे प्रतिपादन जागृती किशोर गुंडावर हिने केले
१ टक्के बोर्डेऑक्स मिश्रणाची तयारी स्पष्ट केली गेली . १किलो तांबे सल्फेट पावडर ५० लिटर पाण्यात विरघळवले त्यानंतर १किलो चुना पावडर दुसऱ्या ५० लिटर पाण्यात विरघडल नंतर तांबे सल्फेट सोल्यूशन चुनामध्ये घालावे आणि सतत ढवळत दोन्ही सोल्यूशन एकाच वेळी ओतले आणि मिश्रण केले
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यकर्मतर्गत येणाऱ्या मारोतराव वाडफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ चे प्राचार्य आर ए ठाकरे, उपप्राचार्य मंगेश कडू , प्रा कुणाल गावंडे , प्रा के ठाकरे , प्रा स्नेहल लोखंडे, प्रा वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले या प्रत्यक्षिकासाठी गावातील समस्त ग्रामस्थ व इतर समस्त शेतकरी बांधव यांचे सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here