कोरोना मुळे निधन झालेल्या पत्रकाराच्या परिवाराला 50 लाखांचा विमा द्या

0
112

चंद्रपूर –

कोरोनासारख्या भीषण संकटात सुद्धा कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आपली सेवा देत आहे, नुकताच सरकारने यांच्यासह पत्रकारांना सुद्धा कोरोना काळात निधन झाले तर त्यांच्या परिवाराला 50 लाखांचा विमा सुरक्षा कवच म्हणून देण्यात येणार असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते, परंतु त्या आश्वासनाची अजूनही पूर्तता झाली नाही.
नुकतेच पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले मात्र अजूनही त्यांच्या परिवाराला सुरक्षा विमा कवच द्वारे आर्थिक मदतही मिळाली नाही.
राज्य सरकारने या विम्याची रक्कम रायकर यांच्या परिवाराला लवकर द्यावी जेणेकरून त्यांच्या परिवाराला आर्थिक बळ मिळेल व अधिस्वीकृती पत्रकारांना सुद्धा हा विमा लागू आहे परंतु आजही अनेक पत्रकारांना अधिस्वीकृती मिळाली नाही म्हणून सरकारने त्या उर्वरित पत्रकारांना सुद्धा ह्या विमा कवच चा लाभ द्यावा अशी मागणी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आले.
चंद्रपूर व गडचिरोली हा महाराष्ट्रातील शेवटचा व टोकाचा भाग आहे, या भागात पत्रकार आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात सुद्धा वृत्त संकलन करीत आहे, अश्यावेळी त्यांना कोरोना झाला व त्यात ते दगावले तर त्यांचा परिवार तर रस्त्यावर येणार, अशी परिस्थिती कुणावरही उदभवू नये यासाठी सरकारने आपले आश्वासन पाळून उर्वरित व शेवटच्या टोकावर वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना 50 लाखांचा सुरक्षा विमा कवचाचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी गेलेल्या शिष्टमंडळात महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन, कार्याध्यक्ष कुक्कु साहनी, उपाध्यक्ष अनिल देठे, महासचिव पुरुषोत्तम चौधरी, सचिव विनोद पन्नासे व कोषाध्यक्ष प्रकाश हांडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here