रेती तस्करांनी लढवली नवीन शक्कल ! प्रशासन याकडे लक्ष देतील काय ?

0
105

घुग्घुस (चंद्रपूर) : मागील दोन वर्षांपासून रेती घाटाचे लिलाव झालेले नसून या दोन वर्षात तसकऱ्यांनी कोटयावधी रुपयांचा शासकीय महसूल बुडविला आहे.

प्रशासनाच्या तावडीतून सुटण्यासाठी घुग्घुस येथील जवळपास डझनभर रेती तसकऱ्यांनी विविध वार्डातील निर्माणाधीन घरासमोर रेती साठा जमवून तेथुन चार ते पांच हजार प्रति ट्रॅक्टरच्या दराने नागरिकांना चोरीची रेती विक्री केल्या जात आहे.
एखाद्याने घर बांधकामाकरिता रेती आणली असून का त्याच्या मागे लागायचे या भावनेतून या रेती साठे कडे दुर्लक्ष केल्या जात आहे.  यामुळेच तस्करांची चांदी होत आहे.
आता प्रशासन याकडे लक्ष देतो काय ? हे येणारा काळच सांगेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here