नात्याला काळीमा! : दिव्यांग भावाने बहिणीचे केले अनेक वेळा लैंगिक शोषण।। * पीडित मुलगी गरोदर असल्याने उघडकीस आला प्रकार *

0
122

*माजरी येथील अल्पवायीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण ।।
*नात्याला काळीमा! दिव्यांग भावाने बहिणीचे केले अनेक वेळा लैंगिक शोषण।।
*पीडित मुलगी गरोदर रहिल्यानंतर प्रकार उघडकीस*

माजरी प्रतिनिधी

माजरी- दिव्यांग भावानेच आपल्या १६ वर्षीय सख्या बहिणीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलगीला दिवस गेले आणि ती गरोदर राहिली. या घटनेतील पीडित मुलीने घाबरून बदनामीच्या भीतीने भावाचे कृत्य लपविन्याचा प्रयत्न केला;मात्र पीड़ित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.माजरी पोलिसांनी पीडित मुलीच्या बयानाच्या आधारे या घटनेतील नराधम भावावर ५ सेप्टेंबर रोजी बलात्कार आणि पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केली आहे.
या घटनेतील आरोपी व त्याची बहिण माजरी येथे राहतात.सदर मूलगी माजरी येथे ९ व्या वर्गात शिक्षण घेत आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांकड़े वरोरा तालुक्यातील रामपुर येथे शेती असल्याने ते रामपुरला वास्तव्यास आहे.दरम्यान पीडिता लॉकडाउनच्या काळात शाळा बंद असल्याने आपले आई-वडिलांकड़े रामपुर या गावात राहयला गेली होती. तिथे पीड़िताने आपल्यावर घड़लेल्या घटनेची माहिती आपल्या आईला सांगितली. मात्र कृत्य करणारा अपलाच मुलगा असल्याने पीडिताची आईने सदर कृत्य लपविल्याची माहिती आहे.
आरोपी हा दिव्यांग असल्याने त्याला स्पष्ट दिसत नाही.सूत्राच्या माहितीनुसार आरोपी व पीडित मुलगी दोघेही सोबत झोपायचे.पीडित मुलगी मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेली असताना तिच्या भावाने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. लैंगिक अत्याचार करणारा आपला सख्खा मोठा भाऊच असल्याने पीड़ित मुलीने घाबरून तसेच बदनामीच्या भीतीने सदर प्रकाराची माहिती कोणालाच दिली नाही; मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्या आई- वडिलांनी तिच्याकड़े विचारपुस केल्यानंतर सदरचे कृत्य मोठ्या भावानेच केल्याचे तिने सांगितले.त्यानंतर त्यांना धक्का बसला.
पीडित मुलीच्या आई-वडिलांनी गरोदर असलेल्या आपल्या मुलीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले होते.दरम्यान अल्पवायीन मुलगी गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिला सामान्य रुग्णालयात उपचार घेण्याचे सांगितले. खासगी डॉक्टराने दिलेल्या सल्लानुसार पीडित मुलीला जिला सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरानी पीडितेला पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे सांगितले. मात्र असे ऐकताच पीडित व तिचे नातेवाईक रुग्णालयातुन पलायन केले. जिल्हा बाल संरक्षण,चंद्रपुर यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार फिर्यादी हर्षा अरुण वरह्याटे,जिल्हा बाल संरक्षण चंद्रपुर यांनी चौकशी करून त्यांनी दिलेल्या अहवालानुसार माजरी पोलिसांनी आरोपी विरुद्ध ५ सेप्टेंबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.या प्रकरणी तपास अधिकारी यानी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी दोन दिवसात प्रसूति होणार असुन बाळाचे जन्म झाल्यानंतर जन्मलेल्या बाळाचे आणि आरोपीचे डीएनएचे नमूने घेवून चाचणी करण्यात येईल.डीएनए चा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.आरोपी नराधमाला आज (गुरुवारी) अटक करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि विद्या जाधव यांचे पथक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here