कहर कोरोनाचा : एक वर्षीय बालिका सह अन्य चार कोरोना संक्रमित , शहराचा एकूण आकडा 102

107

घुग्घुस (चंद्रपूर) :

औद्योगिक शहरात कोरोना संक्रमित रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत असून 11 सप्टेंबर रोजी बँक ऑफ इंडिया परिसरात एक वर्षीय बालिका कोरोना संक्रमित आढळल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासह अन्य चार जण संक्रमित निघाले यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

घुग्घुस येथे कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या 102 तर ऐकून बारा कंटेन्मेंट झोन असून येणाऱ्या दिवसात यात खूप मोठी वाढ होण्याचे लक्षण दिसत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णसेविका ह्या संक्रमित झाल्यामुळे आंतररुग्ण सेवा व OPD हे 10 ते 15 सप्टेंबर पर्यंत बंद करण्यात आली. तीन वैद्यकिय अधिकाऱ्या सह पन्नास कर्मचाऱ्यांना होम कवारंटाईन करण्यात आले आहे.
यासोबतच राजीव रतन केंद्रीय रुग्णालयात ही संक्रमित रुग्ण आढळून आल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे.