केंद्रीय पथकाकडून पूर नुकसानीची पाहणी

91

केंद्रीय पथकाकडून पूर नुकसानीची पाहणी

ब्रम्हपुरी : आगस्ट महिन्याच्या शेवटी वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला यात अनेक घरे पडली, गुर ढोर वाहून गेले, धानपिक नष्ट झाले जीवनावश्यक साहित्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती याची दखल केंद्र सरकारने घेतली असून पूर हानीचा आढावा घेण्याकरिता केंद्रीय पथक ब्रम्हपुरीला दि 11 सप्टें. ला सायंकाळी उशिरापर्यंत दाखल झाले व पाहणी केली.
पुरात झालेल्या शेती नुकसानीची केंद्रीय पथकाने ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी परिसरात पाहणी केली उशीर झाल्याने बेळगाव परिसराचा दौरा केंद्रीय पथकाने रद्द केला गांगलवाडी परिसराची पाहणी केल्यानंतर केंद्रीय पथक गडचिरोलीला रवाना झाले.