वर्धा नदीतील घटना : दोन बहिणीचा नदीत उड़ी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न , एकीचा मृत्यु एक बचावली

0
91

 

वणी / घुग्घूस :

कोना येथील दोन चुलत बहिणीनी रेल्वे पुलावरुन नदीत उड़ी घेतल्याची धक्कादायक घटना दि.10 गुरुवारी दुपारी घडली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारला सकाळी कावड़ी गावातील नदीच्या काठी त्यातील एक ज्योती श्रीकॄष्ण परचाके (२०) जिवंत मिळाली तर दुसरी मृत अवस्थेत आढळून आली आहे.

आचल शंकर परचाके (19) आणि ज्योती श्रीकृष्ण परचाके (20) या वणी तालुक्यातील कोना येथील रहिवाशी असून त्या दोघी चुलत बहिणी आहे. गुरुवार दुपारी 2 वाजताच्या दरम्यान गावशेजारून वाहणाऱ्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या
दरम्यान वर्धा नदीत धरणाचे पाणी सोडल्याने अचानक पाण्याची पातळी वाढली. यावेळी आलेल्या पाण्याच्या जोरदार लोंढ्यात वाढला. दि. 11 शुक्रवारी दुपारच्या सुमारास ज्योती बेशुद्धावस्थेत माजरीलगत कावड़ी येथे मासेमारी करणाऱ्यांना आढळून आली.

तिला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तर शोध पथकाला आचल हिचा मृतदेह सायंकाळी धोरवासा (तेलवासा) शिवारात आढळून आला. पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि मच्छिमारांनी संयुक्तरित्या शोधकार्य केले सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here