शंकरपुरात कोरोनाचा शिरकाव, दोन कोरोना बाधित ,ग्राम पंचायतच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सील

102

 

चिमूर (चंद्रपूर) : पाच महिन्यांचा कालावधी नंतर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे कोरोनाने शिरकाव केला असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व त्यांचे पती कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. शंकरपूर ही मोठी बाजारपेठ असून आजवर हे गाव कोरोणा मुक्त परंतु आज पती-पत्नी यांच्या अहवाल पॉझिटिव आल्याने सतर्कता बाळगन्याचे ग्रापं प्रशासनाने केले असून ग्रामपंचायत च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सिल करण्यात आले आहे. याशिवाय मंगळवार पर्यंत उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कुणीही जाऊ नये. असे आव्हान ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले आहे.