अपघातांमध्ये महापारेषणच्या अधिकाऱ्याचा मृत्यू

0
101

 

वरोरा

नागपूर चंद्रपूर हायवे वरील टेमुर्डा जवळ अपघात झाल्याने महापारेषण 400kv वरोरा येथील कार्यरत अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांचा मृत्यू झाला.

प्रभाकर शंकर रांगणकर वय 58 वर्ष हे वरोरा येथील महापारेषण 400kv कार्यरत होते. ते आपले कर्तव्य बजावून वरोरा येथून वर्धेला परिवाराला भेटण्यासाठी जाण्यासाठी निघाले होते. नागपूर महामार्गाने स्कुटी क्रमांक MH32U3979जात असताना ते टेमूर्डा जवळ ट्रक RJ 07GA9799 वाहनाने धडक दिल्याने महामार्गाच्या बाजूला पडले.
यानंतर त्यांना कोणाचीही तात्काळ मदत मिळाली नाही. आसाळा मार्गे चंद्रपूर जात असताना जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राजूभाऊ मारुती गायकवाड याना ही बाब लक्षात येताच तात्काळ गाडी थांबवुन क्षणाचाही विलंब न करता आपल्या गाडीमध्ये जखमी अवस्थेत असलेल्या इसमाना मानव धर्म समजून मदत केली.दुसरीकडे कोवीड या संसर्गजन्य रोगाच्या भीतीमुळे कोणीही मदत करण्यासाठी हात दिला नाही. त्यामुळे उपचार करण्यासाठी बराच वेळ होऊन गेला होता. मात्र सभापती राजू गायकवाड यांनी हिंमत न हारता या रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पोहोचवूनस दम धरला. व आपल्या देखरेखीखाली त्यांना तपासून घेतले. मात्र रुग्ण दगावल्याची वार्ता कळताच ते भाऊक झाले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आप्त परिवाराला या संबंधित कळविले व मायेचा धीर देऊन आपल्या पुढील कामासाठी ते निघून गेले.अशी जनसेवा करणारे लोकप्रतिनिधी फार कमी आहे. महापारेशनचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्या आत्ता परिवाराला कळविण्यात आले असून महापारेषण अधिकारी व कर्मचारी त्यांच्या या अचानक जाण्यामुळे हळहळ व्यक्त करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here