*पं.स.शाळा केंद्रप्रमुख प्रभाकर पराते ग्राम पंचायत झिलबोडी चे प्रशासक*

0
107

*पं.स.शाळा केंद्रप्रमुख प्रभाकर पराते ग्राम पंचायत झिलबोडी चे प्रशासक*

ब्रह्मपुरी –
ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या झिलबोडी ग्राम पंचायत चे प्रशासक म्हणून ब्रह्मपुरी पंचायत समिती चे शाळा केंद्रप्रमुख प्रभाकर पराते यांनी सोमवार ला आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
राज्यातील अनेक ग्रामपंचायतची मुदत संपली आहे. कोरोनामुळे सध्या ग्राम पंचायत निवडणूका होणे शक्य नसल्याने राज्य सरकारने निवडणुका सहा महिने पुढे धकळल्या आहेत. गावातील कारभार सुरळीत चालावा यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर केली आहे.

माजी सरपंच सौ.पुष्पा ढोरे यांनी झिलबोडी ग्राम पंचायत पदाचा प्रभार संभाळला असून त्यांच्या काळात अनेक विकास कामे पूर्ण झालीत, त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेनी आपला प्रभार सांभाळला त्यामुळे ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना निरोप देण्यात आला.
पं.स .शाळा केंद्रप्रमुख प्रभाकर पराते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच सौ.पुष्पा ढोरे , ग्रामसेवक अमोल शिंदे, प्रत्रकार अमर गाडगे, निखिल डांगे,वीलास धोटे ग्रा.पं.शिपाई हरिजी राऊत ई. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here