कोरोनाची भीती दाखवीत काही खाजगी डॉक्टर्स करीत आहेत नागरिकांची अक्षरशः लूट

0
82

चंद्रपूर – कोरोनाच्या महामारीत खाजगी सिटी स्कॅन धारक अवाजवी दर आकारीत असल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारे आहेत, सामान्य जनता अश्यावेळी जाणार तरी कुठे?
कोरोनाची भीती दाखवीत काही खाजगी डॉक्टर्स नागरिकांची अक्षरशः लूट करीत आहेत.
हे सर्व प्रकार थांबावे व जनतेला योग्य मार्गदर्शन व उपचार मिळावा यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात सिव्हिल सर्जन डॉ. राठोड व मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांची भेट घेत चर्चा केली.
सोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सिटी स्कॅन मशीन लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी अधिष्ठाता मोरे यांनी प्रयत्नशील रहावे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मागणीवर डॉ मोरे यांनी लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सिटी स्कॅन मशीन सुरू करून कोविड व बाकी आजार असलेल्या रुग्णांची चाचणी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश संबंधितांना दिले.
खाजगी सिटी स्कॅनच्या अवाजवी दर नियंत्रित व्हावे यासाठी कोविड नोडल अधिकारी डॉ राठोड यांनी यावर महाराष्ट्र सरकारने समिती गठीत केल्याचे सांगितले व आज नवीन दर संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होणार अशी माहिती देत जर त्यानंतर सुद्धा कुणी अवाजवी दर आकारला त्यावर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती गिर्हे यांना दिली.
शिवसेनेच्या पुढाकाराने आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सिटी स्कॅन मशीन सुरू होणार असून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी आरोग्य प्रशासनाने घ्यायची आहे.
निवेदन देतेवेळी राहुल विरुटकर, गणेश ठाकूर, हर्षल कानमपल्लीवार, हेमराज बावणे व चेतन बोबडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here