चंद्रपूर : आज जिल्ह्यात 373 बाधित तर 5 बाधितांचा मृत्यू

0
79

 

चंद्रपूर  :

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 6682 झाली आहे. यापैकी 3690 बाधित बरे झाले आहेत तर 2903 जण उपचार घेत आहेत.

बुधवारी एकूण 373 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ज्यामध्ये बंगाली कॅम्प परिसरातील येथील 70 वर्षीय पुरुष, महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारपूर येथील 46 वर्षीय पुरुष, क्राईस्ट हॉस्पिटल परिसर येथील 65 वर्षीय पुरुष, टीचर कॉलनी परिसर चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष, पाचवा मृत्यू नवीन एसटी वर्कशॉप परिसर तुकुम येथील 55 वर्षीय पुरुष बाधितांचा मृत्यू झाला. काही मृतक बाधितांना कोरोनासह, उच्च रक्तदाब, मधुमेह व न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 82 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here