ब्रम्हपुरी : मनपा कार्यालय समोर आशा महिलांची बेमुदत कामबंद आंदोलन

0
94

मनपा कार्यालय समोर आशा महिलांची बेमुदत कामबंद आ

ब्रम्हपुरी (चंद्रपूर) :

आयटक चे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात शहरी आशा वर्कर ला कोरोनो काळात प्रतिदिन ३०० रू.देण्याच्या मागणीला घेऊन दि 16 सप्टेंबर 2020 पासून चंद्रपूर महानगर पालिका कार्यालय समोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.यापूर्वी दिं.4 सप्टेंबर रोजी मनपा समोर निदर्शने करून मा.आयुक्त यांना निवेदन दिले होते .परंतु आयुक्त यांनी आशा वरकरच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आशा महिलांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.आज दिवसभर आशा महिला मनपा समोर नारेबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे व उद्या पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आशा व गट प्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ विनोद झोडगे,शहर सचिव प्रतिमा कायारकर,वैशाली जुपाका,सविता गटले वार, प्रेमिला बावणे यांनी दिला आहे.शहरातील 160 आशा वर्कर बेमुदत संपावर गेल्याने कोरो ना काळातील सर्वे व ईतर कामे ठप्प पडली आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here