कोरोनाबाधितांच्या घरीच चोरी : 77 हजार 920 रुपयांचा ऐवज चोरून नेला

130

77 हजार 920 रुपयांचा ऐवज चोरून नेला

घुग्घूस (चंद्रपूर) : शहरातील एका कोरोना बाधितांच्या घरी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे, शहरातील एक नागरिक कोरोना बाधित मिळाल्याने आरोग्य विभागाने त्यांचे संपूर्ण घर सील केले होते.

8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यन्त घरी कुणीच नसल्याने अज्ञात चोरांनी अंधाराचा फायदा घेत 15 ग्राम सोन्याचे दागिने किंमत 77 हजार 920 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

15 सप्टेंबरला बाधित हे कोरोनामुक्त झाल्याने घरी परिवारासह परतल्याने घरातील सामान अस्तव्यस्त स्थितीत दिसल्याने त्यांनी घरातील वस्तूंची पाहणी केली तेव्हा घरातील सोने गायब असल्याने चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी याची तक्रार घुग्घूस पोलीस स्टेशनला केली, पोलिसांनी अज्ञात चोरांविरद्ध गुन्हा दाखल करून तपास करीत आहे.