जागेचा वाद जीवावर बेतला, ग्रामपंचायत सदस्याने केला तलवारीने हल्ला, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

95

 

माजरी

ग्रामपंचायत सदस्य अमित केवट, त्याचा भाऊ राजू केवट आणि दोन नातेवाईक मुख्य आरोपी जागेच्या अतिक्रमणा वरून वाद घटने मध्ये माजरी ग्रामपंचायत सदस्य अमित केवट, त्याचा भाऊ राजू केवट आणि दोन नातेवाईकनी धार धार शस्त्र तलवार व चाकू नी हमला करून नालीत फेकून फरार झाले होते, बाबूं उर्फ अजय यादव याला चंद्रपूर जिल्हा सामन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र त्याची गंभीर प्रक्रुती बघता त्याला गंभीर अवस्थेत सेवाग्राम येथे नेण्यात आले परंतु आज 17 सप्टेंबर लला पहाटे 3 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.
हल्ला करणाऱ्या आरोपी पैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून तीन आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले आहे.
बाबू उर्फ ​​अजय यादव व त्यांच्या बेरोजगार मित्रांनी माजरी च्या LCH क्वार्टर जवळील जमीनवर अतिक्रमण करून दुकान बांधकाम सुरू केले होते, पण अमित केवट ने LCH क्वार्टर जवळील जमीनवर माझा कब्जा आहे असे म्हटल्याने अमित केवट और बाबू उर्फ ​​अजय यादव हे दोघेही माजरी पोलिस स्टेशन गेले होते.पोलिस स्टेशन मधे दोघानांही समजवून घरी पाठवले होते दरम्यान वेकोलि माजरीचे सुरक्षा अधिकारी यांनी माजरी पोलिस स्टेशन मधे तक्रार करून वेकोलिच्या जमीनवर जे बांधकाम सुरू आहे ते बंद करण्यात यावे.
त्यामुळे पोलिस विभागाने सर्व बांधकाम करणाऱ्यांना नोटीस दिले होते.पण तरीही ग्रामपंचायत सदस्य अमित केवट व त्याचा भाऊ राजू केवट यांनी आपल्या नातेवाईकांना घेऊन बाबू उर्फ ​​अजय यादव यांच्यावर प्राणघातक हमला केला त्यात आज पहाटे बाबू उर्फ अजय यादव यांचा मृत्यू झाला. ग्स्या्ा