चंद्रपूर : जिल्ह्यात आज 294 नवीन बाधित , 6 बाधितांचा मृत्यू, आत्तापर्यंत 3836 बधितांना सुट्टी

0
97

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 6976 झाली आहे. गेल्या 24 तासात 294 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 3836 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे तर 6 मृत्यू

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 3045 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 3836 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 88 सह एकूण 95 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे , सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here