बाबांच्या एकलव्यांना मिळाले सुरक्षा कवच* आनंदवनातून झाला सेवा सप्ताह चा शुभारंभ*

122
चंद्रपूर
 पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाचे (१७ सप्टेंबर)औचित्य साधून भारतीय जनता पार्टी तर्फे देशात सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय जनता पार्टी,महानगर चंद्रपूर तर्फे आनंदवनातील कुष्ठरोगी व दिव्यांगांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेपोरायझर व आर्सेनिक अलबम औषध वाटून सेवा सप्ताहाचा शुभारंभ आज गुरुवार (१७ सप्टेंबर)ला करण्यात आला.आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ७० वेपोरायझर मशीन व आर्सेनिक अलबम ३० हे औषध उपलब्ध झाल्याने,आनंदवनच्या एकलव्यांना सुरक्षा कवच मिळाल्याची चर्चा आनंदवनात आहे.
या छोटेखानी कार्यक्रमात अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे व्यवस्थापक गौतम करजगी यांची तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष (श) डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कांचर्लावार,वरोरा नगराध्यक्ष अहतेशाम अली,मनपा नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,जि प सदस्य ब्रिजभूषण पाझारे,महारोगी सेवा समितीचे विश्वस्त डॉ विजय पोळ, सरपंच सुधाकर कडू,दिव्यांग सेवा समितीचे श्रीराम पान्हेरकर,भाजपा नेते डॉ भगवान गायकवाड,सुरेश महाजन,ओम मांडवकर,विनोद लोहकरे,राजेश साकुरे,प्रकाश दुर्गपुरोहित,प्रशांत विघ्नेश्वर,रामकुमारअकापेलिवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी गौतम करजगी म्हणाले,अंडवणातही कोरोनाचा प्रवेश झाला आहे.अश्यात आ मुनगंटीवार यांनी वेपोरायझर व आर्सेनिक अलबम पाठवून परत एकदा त्यांनी कर्मयोगी बाबा आमटे व आनंदवन वरील प्रेम व्यक्त केले.निमित्य मोदींजींच्या वाढदिवसाचे असले तरी,आ मुनगंटीवार समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून कार्य करतात,कोविड १९ च्या संकटात त्यांची भूमिका पालका सारखीच आहे,असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे व महापौर राखी कांचार्लावार यांचे हस्ते गौतम करजगी,डॉ विजय पोळ व सुधाकर कडू यांचा सिंहावलोकन व सैनिकी शाळा पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.तर मान्यवरांच्या हस्ते सुरेश शिरपूरकर,माया जाजू,हेमा भोयर,लक्ष्मी नखाते,सुनील नखाते,ज्ञानेश्वर कुतरमारे,शरद जुमनाके यांना वेपोरायझर मशीन प्रदान करण्यात आली.उर्वरित ६३ वेपोरायझर महारोगी सेवा समितीचे व्यवस्थापक करजगी यांना सुपूर्द करण्यात आल्या.यावेळी डॉ गुलवाडे यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व आ मुनगंटीवार यांच्या सेवाकार्याचा उल्लेख करीत भाजपा सदैव आनंदवन सोबत आहे सांगून कोरोनाच्या संकटात “मीच माझा रक्षक” चा मंत्र स्वीकारण्याचे आवाहन केले.तर महापौर कांचर्लावार यांनी बालपणातील आनंदवन सहलीच्या आठवणींना उजाळा देत सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी डॉ पोळ,अहतेशाम अली यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रकल्प संयोजक प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.सुभाष कासंगोट्टूवार यांनी आभार मानले.यावेळी आनंदवनचे प्रा सुहास पोतदार,रवींद्र निलगीटंवार यांची उपस्थिती होती.