नव – नियुक्त पोलीस अधीक्षक अरविंद साळवे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावतील काय ?

0
137

 

चंद्रपूर : एकेकाळी चंद्रपूर – यवतमाळ जिल्हा हा कोळसा तस्करी व त्यातून होणाऱ्या गोळीबार, खून, गुन्हेगारी व टोळी युद्धामुळे पंचकोशीत प्रसिध्द होते.
मात्र कोळसा खाणीत सुरक्षा कडक झाली व कोळसा तस्करीत नियंत्रण आले.
असे म्हणतात की एक दरवाजा बंद तर दुसरा उघडतो तसेच काही या तस्करां सोबत झाले कोळसा बंद झाले असतांना चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीच्या निर्णयामुळे तस्करांच्या हातात सोन्याची अंडी देणारी कोंबळीच मिळाली दारू तस्करीतुन येणाऱ्या पैशामुळे दारू तस्कर माजून गेले पोलिसांशी साठगांठ राजकीय वरदहस्त व अमाप पैश्याच्या बळावर हे तस्कर पोलिसांच्या जीवावर उठले पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे हे कर्तव्यावर असतांना तस्करांच्या हातून शहीद झाले यासह शेकडो घटना गतकाळात घडल्या आहे.

मात्र दारू तस्करीत किंचित ही फरक पडला नाही डॉ. महेश्वर रेड्डी हे दारू तस्करांवर वचक बसविण्यात स्पेशल अपयशी ठरले मागील दोन महिन्यांच्या काळात दारू तस्करांच्या टोळी युद्धात बल्लारपूर येथील सुरज बहुराशी यांची हत्या झाली.
तेव्हा पासूनच डॉ. रेड्डी यांच्या बदलीची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू होती.
मात्र मध्यकाळी हे अफवा असल्याचे सिद्ध झाले मात्र काल नव्याने आलेल्या निर्देशानुसार अरविंद साळवे हे चंद्रपूर पोलीस अधिक्षकपदी नियुक्त झाले असल्याचे कळाले तर रेड्डी हे अजून ही प्रतिक्षेतच आहे.

डॉक्टर असलेले रेड्डी गेले आणि इंजीनिअर असलेले साळवे हे आले आता जिल्ह्यात वाढलेली संघटित गुन्हेगारी, दारू, गांजा, अफीम, खंडणी, टोळी युद्ध, महिला अत्याचार, नोकरीच्या नावावर फसवणुक, अवैध रेती तस्करीसह अन्य गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यशस्वी होतात काय?

याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here