पारगाव : वीज पडून दोघे पती-पत्नी मृत

159

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) :  तालुक्यात काही तासां अंतर्गत पाऊस व विजाचा कडकळात सुरू होता. ब्रह्मपुरी तालुक्यातील पारगाव येथील दाम्पत्य काही कामासाठी ब्रह्मपुरी ला गेले असता आपले काम पूर्ण करून गावाकडे जाण्यासाठी आपल्या दुचाकीने जात असताना अचानक विजेचा कडकडाटात होऊन भगवती राईस मिल उदापूर जवळ वीज पडून दोघेही पती-पत्नी पिंटू मोतीराम राऊत वय ३० व पत्नी गुंजन पिंटू राऊत वय २६ यांच्या वर विज पडून जागीच ठार झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ह्या दाम्पत्यांना आठ महिन्याचा निरागस बाळ असून या छोट्या मुलांच्या आई वडिलांची छाया लुप्त झाले असल्याने राऊत परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे..