शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा शुल्क कमी करा -प्रसाद आक्कापेल्ली

0
97

___________________________

चंद्रपूर

सध्या संपूर्ण चंद्रपूर जिल्हात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे   शासनाच्या वतीने टाळेबंदी वारंवार  जाहीर करण्यात आली त्यामुळे अनेक पालकांचा रोजगार हा बुडाला होता आता काही अटी शर्तीसह व्यवसाय सुरू झाला आहे पण परिस्तिथी ही पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही दिवसाचा कालावधी लागू शकतो पण
गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील परीक्षा शुल्क हे महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या तुलनेत जास्त असून विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क कमी करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची प्रसाद आक्कापेल्ली यांच्या नेतृत्वात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या  शिष्टमंडळाने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे भेट घेतली यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा शुल्क कमी करण्या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना दिले यावेळी प्रसाद आक्कापेल्ली यांनी महाराष्ट्रात इतर विद्यापीठाच्या तुलनेत गोंडवाना विद्यापीठ हे तीनपट परीक्षा शुल्क आकारत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले त्यांनी सुद्धा ह्या मुद्द्यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here