माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला नागरिकांनी लोकचळवळ म्हणून सहकार्य करा :- नगरसेवक विशाल निंबाळकर

0
117

 

चंद्रपूर
कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक आरोग्य केंद्रा द्वारे माझे कुटुंब माझी जवबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रभागातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती ची वैदकीय चाचणी होणार आहे. नागरिकांनी स्वतः जबाबदार बनून या मोहिमेत सहभागी व्हायचं आहे व प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. विठ्ठल मंदिर प्रभाग 15 मध्ये आरोग्य केंद्र मार्फत माझे कुटुंब माझी जवबदारी या मोहिमेची नगरसेवक विशाल निंबाळकर यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. विशाल निंबाळकर यांनी नागरिकांना आवाहन केले की कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी उपाय योजना करत आहे याला आपण सर्व मिळून सहकार्य करू लोकप्रतिनिधी म्हणून विशाल निंबाळकर यांनी स्वतः व आपल्या कुटुंब ची तपासणी करून या मोहिमेत सहभागी होऊन मोहिमेला प्रभागात सुरवात केली . आरोग्य पथकाद्वारे ऑक्सिमिटर ने तुमचं कुटुंबातील व्यक्ती किती सुरक्षित आहे .थर्मामिटर द्वारे तुमच्या शरीरातील तापमान किती आहे. याचा लेखाजोखा घेऊन , तुमचे कटुंब किती सुरक्षित आहे ते सांगण्या चे काम या मोहिमे द्वारे होणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता या मोहिमेत सहभागी व्हावे असे आहवान नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here