प्राणघातक हल्ल्यातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

0
95

भद्रावती (चंद्रपूर) :

तालुक्यातील माजरी येथे बाबू उर्फ अजय यादववर चाकू व तलवारीने वार करण्यात आले होते. उपचारार्थ मृत्यू झाला. या प्रकरणी पुन्हा दोन आरोपीना चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी अटक केली. त्यांना 23 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील एकजण कोरोना पाॅझिटिव्ह आहे.

माजरी ग्रामपंचायत सदस्य अमित केवट, त्याचा भाऊ राज केवट आणि दोन नातेवाईक आरोपी आहेत.
जागेच्या अतिक्रमणा वरून वाद झाला. माजरी ग्रामपंचायत सदस्य अमित केवट, त्याचा भाऊ राजू केवट आणि दोन नातेवाईकनी धार धार शस्त्र तलवार व चाकूनी हमला करून नालीत फेकून फरार झाले होते. बाबू उर्फ अजय यादव याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची गंभीर प्रकृती बघता त्याला गंभीर अवस्थेत सेवाग्राम येथे नेण्यात आले. परंतु, आज 17 सप्टेंबर लला पहाटे 3 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.
हल्ला करणाऱ्या आरोपी पैकी एकुण तीन आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून एक आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले आहे. हे दोन आरोपी हल्ल्या झाल्या पासून लपून होते आज सकाळी चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी राजू केवट वय 40 वर्षे राहणार वार्ड नंबर चार बांदा दफाई माजरी कॉलरी व आनंद निषाद वय वर्ष 32 राहणार बल्लारपूर यांना अटक करण्यात आली असून या दोघांची कोरोना चाचणी केली असता आनंद निषाद हा कोरोना पाॅझिटिव्ह मिळाला आहे.
बाबू उर्फ ​​अजय यादव च्या मृत्यू ने माजरी मध्ये अत्यंत तणाव ची परिस्थिती निर्माण झाली आहे वरोरा चे पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश पांडे नी माजरीत दंगापथक बोलावले होते मृतकांच्या परिवारानी अंतविधी साठी नकार दिला होता परंतु पोलिसांनी समजूत घातल्या वर अंतविधी पार पडले.
या तीनही आरोपी ला भद्रावती न्यायालयात हाजर केले असता अमित केवट ला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी आणि राजू केवट आणि आनंद निषाद याला 23 सप्टेंबर पर्याय पोलिस कोठडी मिळाली असून आनंद निषाद हा कोरोना बाधित आहे ही संपूर्ण माहिती माजरी पोलीस स्टेशन चे अतिरिक्त ठाणेदार संतोष मस्के यांनी दिली.एक आरोपी अजून फरार आहे त्याचा अद्यापही पत्ता लागला नाही.
या प्रकरणाची तपास वरोरा चे पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष मस्के करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here