आटो चालकांनी  प्रवाशांची नोंद करावी : डॉ मंगेश गुलवाडे

120
चंद्रपूर :
     महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने लॉक डाऊन रद्द करीत व्यवसायासाठी मोकळीक दिली असली तरी ,अधिक सावध राहण्याची आज गरज आहे. त्यामुळे ऑटो चालक व मालकांनी आपला व्यवसाय करताना प्रवाशांची नोंद ठेवावी असे आवाहन महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी केले ते भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे शिवाजी चौक येथे सेवा सप्ताह निमित्त आयोजीत आर्सेनिक अल्बम ३० व सॅनेटायझर वितरण कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते याच वेळी आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या धर्मपत्नी सौ सपना मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ मास्क वितरणही करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजप प्र.का.सदस्य राजेंद्र गांधी,उपमहापौर राहुल पावडे,नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,प्रा. रवी जोगी,महा.आटोरिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर,मधुकर राउत,भाजप चे प्रशांत विघ्नेश्वर,रामकुमार अकापेलीवार,सुनील डोंगरे यांची उपस्थिती होती.
डॉ गुलवाडे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून *”सेवा सप्ताह* १७ सप्टेंबर पासून साजरा केला जात आहे.त्या अनुषंगाने आज आटो चालक व मालकांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले.विशेष बाब म्हणजे आज २० सप्टेंबरला लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची धर्मपत्नी सौ सपना मुनगंटीवार यांचा जन्मदिन आहे.सपनाताईंच्या जन्मदिना निमित्य मास्क वितरण करण्यात आल्याचे डॉ गुलवाडे यांनी जाहीर केले.यावेळी महानगरातील ३००० ऑटो चालकांना १५ हजार मास्क,५हजार सॅनेटायझर (१००मिली),३ हजार डबी आर्सेनिक अलबमचे वितरण १०० आटो चालक प्रमुखांच्या मार्फत करण्यात आले.यशस्वीतेसाठी सुशांत आकेवार,आदित्य डवरे,विनोद चन्ने,रमेश वझे,विलास बावणे,राजू मोहूर्ले, रवी आंबटकर यांनी परिश्रम घेतले.यावेळी राजेंद्र गांधी,राहुल पावडे,सुभाष कासंगोट्टूवार, यांनी मार्गदर्शन केले.सर्वांनी सौ सपनाताई मुनगंटीवार यांना शुभेच्छा दिल्या.