मांगली गावाचे पुनर्वसन करा… उपविभागीय अधिकारी यांना पुनवर्सन संघर्ष समिती तथा ग्रामवासीयांनी दिले निवेदन.!

0
115

 

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी :-
तालुक्यातील मौजा मांगली गावाची भौगोलिक रचना बघितले असता गावालागतच एक नाला आहे.व तो नाला वैनगंगा नदीला जोडला गेला असल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास लवकरच मांगली गावालालगत असलेल्या नाल्याला पूर येतो.त्यामुळे मांगली गावाला पुराचा फटका नेहमीच बसत असून एका बेटाचे स्वरूप निर्माण होत असून ग्रामवासीयांचे पुरामुळे नुकसान होत असते.कारण ग्रामवासीयांना पुरापासून बचाव करण्यासाठी दुसरा मार्गच नसल्याने पुराच्या पाण्याने खूप मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागत आहे.त्यांना जीवन जगणे म्हणजे जणू तारेवरची कसरत आहे. सन -१९४२,१९६२,१९९४,२००५ व आता २०२० च्या महापुराने तर मांगली ग्रामवासीयाना तर सडो की पडो अशी अवस्था करून सोडले.महापुरामुळे धानपिकाची नासाडी,गुरे -ढोर,घरांची पडझड,इतर जीवनावश्यक वस्तूची झालेली नुकसान त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मांगली गावाची कुटुंबसंख्या ३७० व १२०० लोकसंख्या असून अनेक वर्षांपासून महापुराचा तडाखा मांगली ग्रामवासीय शोषत आहेत.या पासून मुक्तता म्हणून सुरक्षित स्थळी मांगली गावाचे पुनर्वसन करावे व जनजीवन सुरळीत करावे या करिता उपविभागीय अधिकारी यांना पुनर्वसन संघर्ष समिती व ग्रामवासीयांनी निवेदन देऊन एकमुखी मागणी केली आहे.या प्रमुख मागणी कडे आपण लक्ष घालावे अशी आर्त हाक निवेदनातुन व्यक्त करीत आहेत.
यावेळी प्रभाकर सेलोकर कार्याध्यक्ष तालुका काँगेस ब्रम्हपुरी यांच्या उपस्थितीत निवेदन देतांना पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष गोकुलदास कार सचिव संजय बिंजवे, नानाजी मुंडरे,आनंदराव ढोरे,आशिष प्रधान,केशव कार,उपकार चहांदे, प्रकाश मेश्राम,सरिता दोनाडकर, कचरू दोनाडकर,रामभाऊ आळे, देवाजी कामडी,जयपाल दोनाडकर,गुलाब कार, प्रवीण मेश्राम,सरिता दोनाडकर, संतोष पिल्लेवान व इतर मांगली ग्रामावसीय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here